breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
#CoronaVirus: पोलिसांची ‘टिकटॉक’वर करडी नजर
करोनाशी लढणाऱ्या शासकीय यंत्रणांबाबत विडंबनात्मक ध्वनिचित्रफिती टिकटॉक अॅपवरून सर्वदूर पसरवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अशा बहुतांश चित्रफितींद्वारे प्रतिबंधात्मक निर्बंध झुगारण्यासाठी चिथावणी दिली जात आहे, हे लक्षात येताच मुंबई पोलिसांनी टिकटॉकवर लक्ष केंद्रित के ले. आतापर्यंत शहरातल्या विविध पोलीस ठाण्यांत आक्षेपार्ह चित्रफिती टिकटॉकवरून सर्वदूर पसरवल्याबाबत चार गुन्हे नोंद के ले गेले. त्यात एकू ण ११ तरुणांना बेडय़ा ठोकण्यात आल्या.