breaking-newsताज्या घडामोडी

#Waragainstcorona: जिल्ह्यात 9 कम्युनिटी किचनच्या माध्यमातून 1 हजार 26 जणांची सोय

कोल्हापूर । महाईन्यूज । प्रतिनिधी

जिल्ह्यातील स्थलांतरीत अडकलेल्या कामगार, मजुरांसाठी 9 ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा, बिस्कीट आणि रात्रीचे जेवण अशी सुविधा या मजुरांसाठी देण्यात आली आहे. याचा लाभ 1 हजार 26 जण घेत आहेत.

तालुका निहाय सुरु झालेली कम्युनिटी किचन

करवीर तालुका- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी. हॉटेल आनंद कोझी, लक्ष्मीपुरी. हातकणंगले-घुगरे सर यांचे निवासी गुरुकुल वडगाव येथे अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव. गगनबावडा- माधव विद्यालय आणि समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह. राधानगरी – पर्यटन निवास ग्रामपंचायत राधानगरी -या ठिकाणी 239 राज्यातील मजुरांना निवाऱ्याची सोय असल्याने कम्युनिटी किचनमधून जेवण पुरवण्यात येत आहे. कागल – श्री श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कुल अशा सात ठिकाणी कम्युनिटी किचन कालपासून सुरु करण्यात आली आहेत. यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा, बिस्कीट, रात्रीचे जेवण देण्यात येत आहे. याचा  लाभ 820 स्थलांतरित कामगारांना होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button