breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#War Against Corona: शेतमाल घरपोच देण्यासाठी वाहनमालकांनी किसान हेल्पलाईन क्रमांकावर माहिती नोंदवावी: पणन संचालक सुनिल पवार

पुणे। महाईन्यूज । प्रतिनिधी

पुणे शहरामध्ये शेतमाल घरपोच देण्यासाठी छोट्या वाहन धारकांनी (3 चाकी, 4 चाकी, पिकअप वाहन इ.) अथवा वाहनमालकांनी कृषि पणन मंडळाच्या किसान हेल्पलाईन क्रमांक 1800-233-0244 द्वारे आपली माहिती उदा. वाहनचालकाचे नाव, वाहन क्रमांक, वाहनाचा प्रकार इ. प्रकारची माहिती नोंदवावी, अशी माहिती राज्याचे पणन संचालक सुनिल पवार यांनी दिली आहे.

ज्या शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट व शेतमाल पुरवठादार यांना अत्यावश्यक सेवा म्हणून शहरी भागात शेतमालाचा पुरवठा करावयाचा असल्यास व  त्याकरिता या वाहनाची आवश्यकता असल्यास त्या वाहनाची माहिती कृषि पणन मंडळामार्फत दिली जाईल.

राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधक उपाययोजना सुरु असल्याने भाजीपाला वितरणासह इतर अत्यावश्यक सेवेचा पुरवठा शहरातील ग्राहक, विविध गृहनिर्माण सहकारी संस्था इत्यादींना करण्यासाठी छोट्या वाहने (3 चाकी, 4 चाकी, पिकअप वाहन इ.) यांची मागणी आहे.  परंतू शेतकरी अथवा शेतमाल पुरवठादारांस बऱ्याच वेळा वाहन उपलब्ध होत नसल्याने शेतमाल शहरी भागात पुरवठा करण्यास विविध प्रकारच्या अडचणी येतात.

शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट व शेतमाल पुरवठादार यांनी शहरात आणलेला शेतीमाल गृहनिर्माण सहकारी संस्थेतील ग्राहकांना वितरीत करण्यासाठी सहज वाहन उपलब्ध झाल्यास शहरी भागात शेतमालाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

यासाठी कृषि पणन मंडळ सदर वाहतूक व्यवस्थेमध्ये समन्वयकाचे काम करीत असून, वाहनचालक / मालक यांनी शहरी भागात शेतमालाचा पुरवठा करीत असताना त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या / पासेस संबंधितांनी घेण्यात यावेत. तसेच वाहतूक खर्च हा शेतमाल पुरवठादार व वाहनचालक / मालक यांनी आपापसात ठरवून घ्यावा. वाहतुकी दरम्यान शेतीमालाचे कोणत्याही कारणामुळे होणारे नुकसान, विलंब, संभाव्य अपघात इ. अडचणीस कृषि पणन मंडळ जबाबदार राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

  शहरी भागात ज्यांना शेतीमालाचा पुरवठा करावयाचा आहे व सदर शेतमाल ज्या वाहनचालकांना वाहतूक करावयाची आहे अशांनी कृषि पणन मंडळाच्या किसान हेल्पलाईन क्रमांक 1800-233-0244 यावर संपर्क करण्याचे आवाहन कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक तथा राज्याचे पणन संचालक  सुनिल पवार यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button