breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#War Against Coroana: रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासंदर्भात आज आहारतज्ञांकडून मोफत ‘लाईव्‍ह’ मार्गदर्शन

– पुण्याचे एसीपी मच्छिंद्र चव्‍हाण यांचे सोशल डिस्टंसिंगवर मार्गदर्शन

– पुण्यातील आहारतज्ञ ज्योत्स्ना लगस यांचा विधायक पुढाकार

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

जगभरात कोविड-19 मुळे हाहाकार माजला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक मुंबई आणि पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. सर्वसाधारणपणे ‘इम्युनिटी पॉवर’(रोग प्रतिकार शक्ती) कमी असलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त असते, असे सांगितले जाते. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढाईत आपला आहार कसा असावा? तसेच नियमित आहाराबाबत काय काळजी घेतली पाहिजे? अशा विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध आहारतज्ञ ज्योत्स्ना चव्‍हाण यांनी मोफत ‘लाईव्ह’मार्गदर्शन उपक्रम हाती घेतला आहे.

‘न्युट्री-इम्युनिटी अगेन्स्ट कोविड-19’च्या माध्यमातून आज (दि.16 एप्रिल2020) सायंकाळी 5 ते 6. 30 यावेळेत फेसबूकच्या माध्यमातून मोफत लाईव्‍ह वेबीनार होईल. त्यासाठी http://cdn.24fd.com/e20/04/MyFitnessMantra/16/index.html या लिंकवर नागरिकांना नोंदणी करावी लागणार आहे. या वेबिनारमध्ये पुण्याचे सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्‍हाण, अपोलो हॉस्पिटलचे डॉ. अशिश गोयल, जयपूर येथील आहारतज्ञ तनू दुबे, लुधियाना येथील आहारतज्ञ रुची शुक्ला सहभागी होणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. त्यासोबतच कोरोनापासून दूर राहण्यासाठी आपली रोग प्रतिकार क्षमता वाढवणेही तितकेच गरजचे आहे. त्यासाठी आपण संतुलित आहार घेणे अपेक्षित आहे. आपण कोणता आहार घेतला पाहिजे? घरातील उपलब्ध खाद्यपदार्थांच्या आधारे आपण कशाप्रकारे रोग प्रतिकार क्षमता वाढवू शकतो? नियमित आहाराबाबतही या वेबिनारच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 8446109972 या मोबाईल क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सोशल डिस्टंसिंग : काय करावे आणि काय नाही?

पुणे शहरचे सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्‍हाण वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना सोशल डिस्टंसिंग याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. नागरिकांनी घरामध्ये आणि अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर पडल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे? याबाबत चर्चा केली जाणार आहे. तसेच, पोलीस प्रशासन आणि नागरिकांची कर्तव्य याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button