breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

रयतेचे कल्याणकारी राज्य हवे; तर ‘‘स्वराज्य यात्रेत’’ सहभागी व्हा : आपचे नेते मयूर दौंडकर

आम आदमी पार्टीची महाराष्ट्रात धडक : दि. २८ मे पासून पंढरपूर ते रायगड स्वराज्य यात्रा

पुणे : राज्यातील रयतेचे कल्याणकारी राज्य हवे असेल, तर आम आदमी पार्टीच्या वतीने सुरू होणाऱ्या ‘‘स्वराज्य यात्रेत’’ सहभागी व्हा. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि सत्तेतील वतनदारांना घरी बसवण्यासाठी या यात्रेचे साक्षीदार व्हा, असे आवाहन आपचे नेते मयूर दौंडकर यांनी केले आहे.

आम आदमी पार्टीतर्फे दि. २८ मे पासून श्रीक्षेत्र पंढरपूर ते रायगड अशी ‘‘स्वराज्य यात्रा’’ काढण्यात येणार आहे. आम आदमी पार्टीचा विचार जनसामान्यापर्यंत पोहचवणे, लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडणे, सत्तेतील वतन दारांना हटवून सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या सर्वसामान्यांचे राज्य आणण्याचे उद्दीष्टाने ही यात्रा काढण्यात येणार आहे.

यात्रेचा मार्ग सोलापूर-इंदापूर-भिगवण-बारामती-फलटण-कोल्हापूर-सांगली-सातारा-पुणे- पिंपरी चिंचवड-पनवेल-अलिबाग-रायगड असा असून, दहा दिवसांचा प्रवास
पंढरपूर येथून सुरू होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन दि. ६ जून रोजी रायगड येथे यात्रेची सांगता होणार आहे.

कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह…
राज्यात आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ‘‘स्वराज्य यात्रा’’ निर्णायक ठरणार आहे. आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील भाजपाविरोधी पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. देशपातळीवर आप भाजपाला पर्याय म्हणून आप समोर येत आहे. त्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.


‘भक्ती-शक्तीचा संगम’ म्हणून ही यात्रा महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठूमाऊलीचा आशीर्वाद घेवून श्रीक्षेत्र पंढरपूर येथून मार्गक्रमण करत आहे. शिवराज्याभिषेक दिनी दि. 6 जून रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपतींचा आशीर्वाद घेवून समाप्त होईल. सर्वांनी आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, छत्रपतींच्या स्वप्नातील रयतेचे कल्याणकारी राज्य घडविण्यासाठी, स्वराज्य यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सामील व्हावे. महाराष्ट्रात बदल घडवावा.
– मयूर दौंडकर, अध्यक्ष, आप नेते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button