breaking-newsराष्ट्रिय

सिद्धूंच्या राफेल वक्तव्यावर भाजपाचा पलटवार, काँग्रेसवर टीका

पाकिस्तानमध्ये करतारपूर कॉरिडॉरच्या शिलान्यासावेळी पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर भाजपाने पलटवार केला आहे. सिद्धू यांच्या राफेलवरील वक्तव्यावरुन काँग्रेसचे चरित्र दिसून येते, अशी टीका भाजपाने केली आहे. माझी मिठी एक सेकंदाची होती. माझी मिठी राफेल करार नव्हती, असा उपहासात्मक असा टोला सिद्धू यांनी लगावला होता. सिद्धू यांच्या या वक्तव्याचा समाचार भाजपाने घेतला आहे. वेडेपणा हा संसर्गजन्य आहे. सिद्धूंनी राफेलचा खोटेपणा पाकिस्तानला नेला आहे. पाकिस्तानमध्ये त्यांना सहकारी मिळाला आहे, असे भाजपाने म्हटले आहे.

.

भाजपाने म्हटले की, काँग्रेसने सिद्धूंच्या माध्यमातून आपले राफेल अभियान पाकिस्तानला पाठवले आहे. सिद्धूंनी तिथे भारत सरकारवर टीका केली आहे. त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना देवदूत म्हटले आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानमध्ये पत्रकार परिषद घेतल्यानंतर काही तासातच भाजपाने ट्विट केले आहे. सिद्धू तिथे करतारपूर कॉरिडॉरच्या शिलान्यासाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले आहेत. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, पाक लष्करप्रमुखांबरोबरची माझी मिठी ही अवघ्या काही सेकंदाची होती. तो काही राफेल करार नव्हता, असे उपहासात्मकरित्या म्हटले होते.

सिद्धू हे पाकिस्तानला गेल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून मोठ्याप्रमाणात टीका होताना दिसते. परंतु, त्यांच्याच पक्षाचे काही नेतेही दबक्या आवाजात याचा विरोध करत आहेत. पाक लष्करप्रमुखांना मारलेल्या मिठीमुळे पाकिस्तान करतारपूर कॉरिडॉरचे काम करण्यासाठी तयार झाल्याचा दावा सिद्धू यांनी केला आहे.

दरम्यान, सिद्धू यांच्या पाकिस्तान दौऱ्यावर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सिद्धू यांनी मला म्हटले होते की, त्यांनी तिथे (पाकिस्तान) जाण्याचे वचन दिले आहे. तसेच हा माझा वैयक्तिक दौरा असून यावर आपण नंतर बोलू असे म्हटले. पण नंतर ते पुन्हा माझ्याकडे आले नाहीत. मी कोणालाही त्यांच्या वैयक्तिक दौऱ्यावर जाण्यापासून रोखत नाही. हा अधिकृत दौरा नव्हता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button