breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

निहालची आत्महत्या नसून हत्याच ; मित्रांनीच गोळ्या झाडल्याचे तपासात उघड

पिंपरी – चिंचवड येथील निहाल नाणेकर याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली नसून त्याच्यावर मित्रांनीच गोळ्या झाडल्या आहेत. ही बाब पोलीस तपासात समोर आली असून त्यानुसार कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

निहालचे वडील पांडुरंग सहदेव नाणेकर (रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विकी घोलप आणि संकेत साटणकर (दोघे रा. चिंचवड) यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निहाल त्याच्या विकी आणि संकेत या दोन मित्रांसोबत रविवारी (दि. 10) रात्री साडेआठच्या सुमारास कामशेत येथील राजवाडा हॉटेलमध्ये आला होता. त्यांनी हॉटेलमध्ये खाण्यासाठी भजी मागवली. दरम्यान, निहालला आकाश लांडगे याच्या एका नातेवाईकाचा फोन आला. त्यानंतर गोळी झाडल्याचा आवाज झाला. हॉटेल कर्मचारी निहाल बसलेल्या टेबलकडे धावले असता, त्यांना निहाल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याची माहिती निहालच्या मित्रांकडून मिळाली. मात्र निहालला लागलेली गोळी ही मारून घेतली नसून ती मारल्याचे तपासात समोर आले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून विकी आणि संकेत या दोघांना कामशेत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निहाल कुठल्याही तणावात नव्हता. तसेच कुठल्याही तणावातून तो आत्महत्या करू शकणार नव्हता, अशी माहिती नेहालचे वडील पांडुरंग यांनी पोलिसांना दिली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button