पिंपरी / चिंचवड

विठ्ठल शेलार, शरद मोहोळ टोळ्या आमनेसामने

पिंपरी l प्रतिनिधी

शरद मोहोळ टोळीच्या सदस्यांनी विरोधक विठ्ठल शेलार समजून एका गाडीवर दगड व कुंड्या फेकून मारून हल्ला केला. राधा चौक, म्हाळुंगे येथे रस्त्यावर दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. हा प्रकार 8 जानेवारी रोजी मध्यरात्री सव्वाबारा ते एक वाजताच्या कालावधीत घडला.

शरद हिरामण मोहोळ (रा. माऊलीनगर, सतारदरा, कोथरूड), आलोक शिवाजी भालेराव (रा. वडाची वाडी, पौड रोड, कोथरूड), मल्हारी मसुगडे (रा. माळवाडी, पुनावळे), सिद्धेश बाहू हगवणे (वय 30, रा. म्हाळुंगे, पुणे) आणि पाच ते सहा अनोळखी इसम (नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समाधान कदम यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल शेलार याने व्यावसायिक वादातून सिद्धेश हगवणे याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिली. सिद्धेश हगवणे हा शरद मोहोळ टोळीतील सदस्य आहे. त्याने शरद मोहोळ याच्या सांगण्यावरून सिद्धेश हगवणे, मल्हारी मसुगडे, आलोक भालेराव यांनी विठ्ठल शेलार आणि त्याचे सहकारी समजून एका कारमधून जाणा-या साथीदारांवर दगड आणि कुंड्या फेकून मारत गंभीर हल्ला केला. तसेच राधा होते व तिथून येणा-या जाणा-या लोकांच्या जीवाची पर्वा न करता सार्वजनिक रस्त्यावर दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडल्या. आरोपींनी लोकांमध्ये दशहत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नकुल न्यामणे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button