breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमहाराष्ट्रमुंबईराजकारण

दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी लस बंधनकारक नाही; शिक्षण मंडळाची माहिती

मुंबई |

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्या, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. परंतु परीक्षा या ऑनलाइन नाही तर ऑफलाइन पद्धतीनेच घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसंच दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. दहावीची लेखी ऑफलाइन परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहे. त्याची तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ दरम्यान होणार आहे.

तर बारावीची लेखी परीक्षा ४ ते ३० मार्च दरम्यान होणार असून १४ ते ४ मार्च तोंडी परीक्षा होईल अशी माहिती शरद गोसावी यांनी दिली आहे. अपरिहार्य कारण असेल तर विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात येणार आहे. सध्या करोनाची तिसरी लाट सुरू आहे. त्यामुळे या परीक्षांसाठी लसीकरण बंधनकारक असणार का?, असा प्रश्नही उपस्थित होत होता. परंतु परीक्षांसाठी लसीकरण बंधनकारक नसल्याची माहिती शरद गोसावी यांनी दिली. दहावी बारावीच्या परीक्षेसाठी करोना लस बंधनकारक नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं लसीकरण झालेलं नाही, ते देखील परीक्षेसाठी हजर राहू शकतात.

  • परीक्षेसाठी अधिकचा वेळ दिला जाणार –

दरम्यान ७० ते ८० गुणांच्या पेपरला अर्धा तास अधिक वेळ दिला जाणार असून ४० ते ६० गुणांच्या पेपरला १५ मिनिटं अधिक वेळ दिला जाईल. करोनामुळे परीक्षा देण्याची संधी हुकली तर ३१ मार्च ते १८ एप्रिलदरम्यान पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. तसंच १५ पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर जवळचं महाविद्यालय केंद्र असणार आहे. दरम्यान दहावीसाठी १६ लाख २५ हजार ३११ आवेदन पत्रं मिळाली असून बारावीसाठी १४ लाक ७२ हजार ५६५ आवेदन पत्रं प्राप्त झाली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button