breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत आज लसीकरण बंद

मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकजणांना संसर्ग होत असतानाच अनेकजण आपला जीव गमवावा लागत आहे. त्यातच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे लसीकरण आज रविवारी संपूर्णपणे बंद असणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने तसेच रविवारी लसीकरण बंद असले तरीही सोमवारच्या लसीकरणाबाबतची माहिती पालिकेकडून देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

‘प्रिय मुंबईकरांनो…रविवारी शहरात लसीकरण बंद असणार आहे. आम्ही आशा करतो की तुम्ही रविवारचा आनंद घ्याल. सोमवारच्या लसीकरणासंदर्भातील माहिती ट्विटरच्या माध्यमातून आणि सदर प्रभागांमधूनही देण्यात येईल’, असे पालिकेकडून ट्विट करत सांगण्यात आले आहे.

महत्त्वाचे म्हणजे लसींचा तुटवडा असल्यामुळे नाही, तर रविवार असल्याने शहरात लसीकरण प्रक्रियेला ब्रेक दिला जात असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button