breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Unseasonable Rain in Maharashtra : राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा ‘तडाखा’

मुंबई | महाईन्यूज | ऑनलाईन टीम

राज्याच्या काही भागांमध्ये शनिवारी (दि. 29) अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, जळगाव, जालना या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. तर, काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी पडल्या. या अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे डोक्यावर आधीच कर्जाचा डोंगर असलेला शेतकरी पुन्हा शेतीउत्पादनाला मुकला आहे.

सोलापूर जिल्ह्यात मध्यरात्री अवकाळी पावसानं थैमान घातलं. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. विशेष करुन द्राक्ष उत्पादक आणि ज्वारी उत्पादक शेतकर्‍यांना याचा मोठा तडाखा बसला. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी चिंतेत पडला आहे. सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. मध्यरात्रीपासूनच विजेच्या कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. मुख्यतः सोलापूर शहरासह बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ आणि जिल्ह्यातील इतर काही भागात वादळी पाऊस झाला.

यात द्राक्ष, ज्वारीसह हाताशी आलेल्या अन्य पिकांचं मोठं नुकसान झालं. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. रविवारी (दि. 1) सकाळच्या सत्रातही मोहोळ तालुक्यातील शेटफळ परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. तसेच, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहर आणि तालुक्यातील काही भागात गारपीटीसह अवकाळी पाऊस पडला. काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या सरी पडल्या, तर काही ठिकाणी दमदार पाऊस झाला. ध्यानीमनी नसताना अगदी उन्हाळ्याच्या तोंडावर अचानक पाऊस आल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसात खळ्यात मळ्यात उघड्यावर असलेला कांदा भिजून खराब झाला.

त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. गहू, हरबरा आणि कांदा पीक गारपीटीमुळे खराब होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच, औरंगाबाद आणि जालना येथे देखील अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद शहर आणि ग्रामीणमध्ये जोरदार पाऊस बरसला. यात हरभरा, गहू, करडी, तूर आणि ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालं. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुका आणि इतर काही परिसरात अवकाळी पाऊस झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button