TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणे

पुण्यासह ग्रामीण भागामध्ये बंद सदनिका फोडणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने सापळा रचून अटक

पुणे महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

पुण्यासह ग्रामीण भागामध्ये बंद सदनिका फोडणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून आठ गुन्हे उघडकीस आले असून, १० लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

युवराज वसंत मोहिते (वय ३४, रा. सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार संगतसिंग अजिमिरसिंग कल्याणी हा फरार झाला आहे. कोथरूड भागातील बंद सदनिका फोडल्याच्या प्रकरणाचा तपास युनिट तीनचे पथक करत होते. ही घरफोडी अट्टल गुन्हेगार संगतसिंग व साथीदार युवराज मोहिते यांनी केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांची माहिती घेत असताना दोघे दुचाकीवर वंडर फ्युचर परिसरात साथीदाराला भेटण्यास येणार असल्याचे समजले. सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सहायक निरीक्षक राहुल पवार, संजीव कंळबे व त्यांच्या पथकाने सापळा रचला. दोघे दिसताच त्यांना आडवे जाऊन थांबविण्याचा प्रयत्न केल्यानंतर संगतसिंग हा दुचाकीवरून उडी मारून टेकडीवर पळाला. त्याचा पाठलाग केला. पण, तो सापडला नाही. युवराज मोहिते याला मात्र पकडण्यात आले.

मोहिते याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने व संगतसिंग याने कोथरूड, सिंहगड, अलंकार, दत्तवाडी, खेड व पंढरपूर येथे घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ८ गुन्ह्यांची उकल करत १८० ग्रॅम वजनाचे सोने, १७२ ग्रॅम चांदी व दोन दुचाकी असा १० लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button