‘पुष्पा’ने का नाकारली दारू कंपनीची कोट्यवधी रुपयांची जाहिरात?
![Why did 'Pushpa' reject the liquor company's advertisement of crores of rupees?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Why-did-Pushpa-reject-the-liquor-companys-advertisement-of-crores-of-rupees.jpg)
मुंबई : ‘पुष्पा’फेम, दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन हा नेहमीच अनेक सतत चर्चेत असतो. सध्या एका वेगळ्याच कारणामुळे तो चर्चेत आहे. त्यांच्या निर्णयामुळे चाहते त्यांचे कौतुक करीत आहेत. याची सध्या समाजमाध्यमांवर खूप चर्चा सुरु आहे.
‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुनने दारु कंपनीची कोट्यावधी रुपयांची जाहिरात नाकारली आहे. आता अल्लू अर्जुनला आरोग्यासाठी हानिकार असणाऱ्या दारु कंपनीची जाहिरात नाकारली आहे. अल्लू अर्जुनला या प्रसिद्ध बॅडच्या दारुच्या जाहिरातीसाठी दहा कोटी रुपये मानधन मिळणार होते. पण त्याने ते नाकारलं.
तंबाखू आणि गुटखा यांच्या जाहिरातीच्या ऑफर नंतर अल्लू अर्जुनला दारुच्या एका ब्रँडची ऑफर आली होती. पण अल्लू अर्जुनने या जाहिरातीला नकार दिला आहे. समांथा रुथ प्रभू पासून ते प्रियांका चोप्रा, आलिया भट्टपर्यंत अनेक कलाकार या ब्रँडच्या जाहिरातीशी जोडले गेले आहेत. पण अल्लू अर्जुनचे असे म्हणणे आहे की अशा जाहिरातींसाठी नाव जोडल्यामुळे त्यांच्या विक्रीमध्ये वाढ होते.
काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. अल्लू अर्जुनचा लवकरच ‘पुष्पा २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण देखील सुरु झाले आहे. पण सध्या काही कारणास्तव ते थांबवण्यात आले आहे.