Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ‘‘येलो अलर्ट’’

मुंबई : राजाच्या विविध भागात गणेशोत्सवात मुसळधार पावसानं हजेरी लावली. अशात आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. थोडीफार उघडीप घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा जोरदार बरसणार आहे. मुंबई, ठाण्यासह महत्त्वाच्या परिसरामध्ये पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे.

लातूर, बीड, नाशिक, परभणी जिल्ह्यातही पाऊस पडला. पण आता लांबलेल्या पावसामुळे पिकं धोक्यात आल्याचे चित्र आहे. पण अशातच आज हवामान खात्याकडून पश्चिम महाराष्ट्रासह, मराठा, विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर गुरुवारपासून पावसाचा जोर राज्यात वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
खरंतर, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्याचं पाहायला मिळालं यामुळे शेतीची काम खोळंबली होती. पाऊस नसल्यामुळे अनेक पिकं उध्वस्त झाली. पण आता पुन्हा पावसाची चाहूल लागली लागल्याने शेतकरी सुखावले तर पिकांनाही जीवनदान मिळेल.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button