TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपुणे

चाकण औद्योगिक क्षेत्रात सिलिंडरच्या स्फोटाने दोघांचा मृत्यू, सहा गंभीर जखमी

पुणे : पुणे येथील चाकण औद्योगिक क्षेत्रातील राणुबाईमळा येथे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट बुधवारी (ता. २१) रात्री साडेआठच्या सुमारास झाला आहे. स्फोट इतका जबरदस्त होता, की इमारतीच्या भिंती पडल्या आहेत. या घटनेत एका वयोवृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला असून एका १९ वर्षीय तरुणाचा पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यु झाला. आगीच्या दुदैवी घटनेत सहा जण गंभीररित्या भाजले असुन त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

चंद्रभागा पांडुरंग बिरदवडे (वय.७५) आणि अक्षय सुरेश बिरदवडे (वय. १८ ) असे मृत्यू झालेल्यांचे नावे आहेत. लक्ष्मीबाई बिरदवडे (वय ७८ ), तुकाराम परशुराम बिरदवडे, संगीता सुरेश बिरदवडे (वय ४० ), वैष्णवी ऊर्फ ताई सुरेश बिरदवडे (वय २०) हे किरकोळ जखमी झाले आहेत. तर अन्य भाडेकरूदेखील यात जखमी झाले आहेत. याच्यांवर रुग्णालयात तातडीने उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चाकण औद्योगिक क्षेत्रातील राणुबाईमळा येथे राहणारे भाऊ परशुराम बिरदवडे यांच्या घरात अचानक घरगुती सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत एका वृद्ध महिलेचा आणि एका तरुण मुलाचा मृत्यू झाला. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी हजेरी लावली. घटना रात्री घडल्यामुळे रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी मदतकार्य सुरू होते. या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सिलेंडरमधून गळती झाल्याने हा स्फोट झाल्याचा अंदाज लावला जात आहे.

दरम्यान, घटना घडताच माजी सरपंच दत्तात्रय बिरदवडे, तुकाराम परशुराम बिरदवडे, संतोष विठोबा बिरदवडे, अक्षय जंभुकर, सुधाकर जंबुकर, आकाश लेंडघर, रविंद्र बिरदवडे, माऊली बिरदवडे, अक्षय बिरदवडे, संदिप बिरदवडे, स्वप्नील बिरदवडे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पुणे जिल्हा शिवसेना संघटक राहुल गोरे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button