ताज्या घडामोडीमुंबईराजकारण

खंडणी प्रकरणातील आरोपी अरुण गवळी संदर्भातील कागदपत्रे गहाळ

नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्येप्रकरणी मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा

मुंबई : खंडणी प्रकरणातील आरोपी अरुण गवळी संदर्भातील काही कागदपत्रे गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अरुण गवळी याच्यावर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम अ‍ॅक्ट (मोक्का) लागू करण्यासंदर्भात कागदपत्रे गहाळ झाल्याची माहिती शुक्रवारी क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी मुंबई सत्र न्यायालयात मोक्का कोर्टात दिली. शिवसेना नेते आणि नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. अरुण गवळी सध्या जामिनावर बाहेर आहे. कथित खंडणी, आर्थिक लाभ आणि 2005 मध्ये मुंबई, ठाणे आणि कल्याणधील मालमत्ता हडप करण्यासाठी काहींना धमक्या दिल्याचा आरोप अरुण गवळी आणि त्याच्या टोळीतील काही जणांवर आहे.

खंडणी प्रकरणात उलट तपासणीसाठी गवळीच्या वकिलांना कागपदत्रांची मागणी केली होती. पण, विशेष सरकारी वकिलांनी 2013 मध्ये मुंबईत पूर आला असताना ठेवलेली कागदपत्रे सापडत नसल्याचं न्यायालयात म्हटलं. न्यायालयानं गेल्याच महिन्यात पोलिसांना कागदपत्रांवरून खडसावलं होतं. अस्पष्ट विधान मान्य केली जाणार नाहीत, असं म्हटलं होतं. दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खटल्यास आणखी विलंब करू शकत नाही. त्यामुळे कागदपत्रे सादर करण्यास किती वेळ लागेल? ते सांगा, अशा शब्दांत न्यायालयाने पोलिसांना सुनावलं होतं.

नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील एका बिल्डरला 2005 मध्ये गवळीच्या टोळीकडून धमकीचे फोन आले होते. त्यात राम श्याम को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीत पुनर्विकास प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी 50 लाख रूपयांची मागणी केली होती. त्यासह बिल्डरला ठार मारण्याच्या धमक्या देऊन गवळीचे घर असलेल्या दगडी चाळीत जाण्यास सांगितलं होतं. नंतर गवळी आणि त्याच्या साथीदारांवर खंडणी, धमकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यानंतर गवळी आणि त्याच्या साथीदारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button