जिजाऊ महिला बचत गटातर्फे हळदी-कुंकू समारंभ उत्साहात
अध्यक्षा निशाताई पडवळ यांचे यशस्वी आयोजन, नेहरुनगर परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरीः नेहरूनगर येथील जिजाऊ महिला बचत गटातर्फे हळदी कुंकू समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड शहरातून विविध ठिकाणांहून महिलांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली. जिजाऊ महिला बचत गटाच्या अध्यक्षा निशाताई पडवळ यांनी यशस्वी आयोजन करत उपस्थित महिलांना वाण भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
तर उपाध्यक्षा प्रतिभा वानखडे, खजिनदार बबीता पवार, कार्यवाहक. धनश्री घाडगे, मधु शिंदे, रेखा ढाकले, राधा जाधव, सीमा गायकवाड, राणी वाघमारे, कोमल पोतेकर, कल्याणी दुर्गावळे, क्षितिजा काळभोर, मेघा घाडगे, डॉली गुप्ता, शरदा दातार आदींचे कार्यक्रम यशस्वीततेसाठी सहकार्य लाभले.
यावेळेस कार्यक्रमाला नेहरूनगर संत तुकाराम नगर, फुलेनगर, विठ्ठल नगर, येथील महिलांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाला बचत गटाच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या राखी धर, सुरेखा जगदाळे, वर्षा जगताप, पुनम सुरभी, सत्वशिला कांबळे, वनिता कांबळे, शारदा इंदलकर, स्वीटी मलातपुरे, शेख मॅडम, पुनम सिंग, राणी वाघमारे, कोमल वाघमारे, अनिता पवार, श्वेता चव्हाण, ललिता कटियार, शर्मिला लांडगे, गुलशन शेख, मोनिका ढाली, नूतन कांबळे, कांता बनसोडे, कौसर शेख, उषा कदम कल्पना श्वेते, निकिता मेहरे, वैशाली सूर्यवंशी, वैशाली शेवाळे, महालक्ष्मी सत्तार, गीता चौधरी, डिंपल चौधरी आदी महिलांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली. यावेळी आजीविका ब्यूरो संस्थेतर्फे महिला कामगारांना विविध योजनांची माहिती देण्यात आली.