मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रणाला धमकीचा मेसेज ; वाचा काय लिहलं
![Threat message to traffic control of Mumbai Police; Read what was written](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Threat-message-to-traffic-control-of-Mumbai-Police-Read-what-was-written.png)
मुंबई : मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रणाला धमकीचा मेसेज आला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर हा धमकीचा मेसेज पाठवल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये २६/११ सारखा हल्ला होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअॅपवर पाकिस्तानी नंबरवरून या धमकीची माहिती देण्यात आली.
मेसेजकर्त्याने सांगितले की, जर तुम्ही त्याचे लोकेशन ट्रेस केले तर ते भारताबाहेर दिसेल आणि स्फोट मुंबईत होणार आहे. या धमकीमध्ये असंही लिहण्यात आलं आहे की, भारतात ६ लोक हे काम पार पाडणार आहेत. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून इतर यंत्रणांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.
खरंतर, रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर इथं दोन संशयास्पद बोट आढळून आल्यानंतर आता राज्यासाठी आणखी एक धोकादायक बातमी समोर आली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुमला भारताबाहेरच्या एका नंबरवरून दहशतवादी हल्ला होण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई सध्या अलर्ट मोडवर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवर २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी या मेसेजद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण पोलीस विभागात यामुळे खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई पोलिसांना ही धमकी देण्यात आली आहे. भारताबाहेरच्या नंबरवरून हे मेसेज मुंबई पोलिसांना पाठवण्यात आले आहेत.