टायर फुटले, नदीच्या पुलाचे कठडे तोडून पिकअप ५० फूट खोल नदीत कोसळली अन्…
![The tires burst, the bank of the river bridge was broken and the pickup fell into the 50 feet deep river and ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/The-tires-burst-the-bank-of-the-river-bridge-was-broken-and-the-pickup-fell-into-the-50-feet-deep-river-and-....jpg)
अकोला: अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसाने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यात सततच्या पावसामुळे नदीच्या पुलावरून वाहन चालवताना चालकाचं वाहनावरील नियत्रंण सुटलं. त्यानंतर चारचाकी वाहन तब्बल ५० फूट खोल नदीत पडले. ही घटना अकोला जिल्ह्यातील म्हैसांगच्या पूर्णा नदीजवळ घडली.
अकोला-दर्यापूर रस्त्यावर असलेल्या म्हैसांगजवळ पूर्णा नदी आहे. यावर मोठा पुल आहे. अकोला अमरावती हा रस्ता चांगला असल्याने वातुकीची वर्दळ या रस्त्यावर अधिक आहे. या रस्त्यावरून सुसाट धावणारे वाहने आणि होणारे अपघात ही चिंतेची बाब बनली आहे. मंगळवारी मध्य रात्रीच्या दरम्यान अकोल्याहून अमरावतीकडे जाणारं पीकअप वाहन भाजीपाल घेवून जात होते. मात्र, अचानक म्हैसांगच्या पूर्णा नदीच्या पुलाचे कठडे तोडून हे वाहन थेट ५० फूट खोल नदीत पडले.
वाहनाचे टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. या अपघातात सचिन वामन मालठे आणि विशाल श्रीनाथ दोघे हे दोघे जण गंभीर जाखमी झाले आहेत. त्यांना गावकऱ्यांच्या मदतीने तत्काळ अकोला सर्वोपचार रुग्णालय उपरार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, आज नदीत कोसळलेल्या वाहनाला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले.