मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार झाला आहे. शिंदे गट आणि भाजपकडून प्रत्येकी नऊ-नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता नव्या सरकारचं संभाव्य खातेवाटप समोर आलं आहे. दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल मंत्रिपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे, तर भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन यांच्याकडे पुन्हा जलसंपदा मंत्रालयाची जबाबदारी दिली जाण्याची चिन्हं आहेत.
गृह खात्यावरुन शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये रस्सीखेच झाल्याची चर्चा आहे. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृह मंत्रिपदाचा आग्रह सोडला आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला, असं बोललं जातं. देवेंद्र फडणवीस गृह आणि अर्थ या दोन्ही वजनदार खात्यांची जबाबदारी पेलण्याची चिन्हं आहेत. तर ठाकरे सरकारप्रमाणे एकनाथ शिंदे नगरविकास मंत्रालय सांभाळण्याचे संकेत मिळत आहेत.
शिंदे फडणवीस सरकारचे संभाव्य खातेवाटप
एकनाथ शिंदे – नगरविकास मंत्रालय
देवेंद्र फडणवीस – गृह आणि अर्थ मंत्रालय
सुधीर मुनगंटीवार – ऊर्जा मंत्रालय
गिरीश महाजन – जलसंपदा मंत्रालय
राधाकृष्ण विखे पाटील – महसूल मंत्रालय
संजय राठोड – ग्रामविकास मंत्रालय
विजयकुमार गावित – आदिवासी विकास मंत्रालय
भाजपकडून कोणाकोणाचा शपथविधी?
राधाकृष्ण विखे पाटील
सुधीर मुनगंटीवार
चंद्रकांत पाटील
विजयकुमार गावित
गिरीश महाजन
सुरेश खाडे
रवींद्र चव्हाण
अतुल सावे
मंगलप्रभात लोढा
शिंदे गटाकडून कोणाकोणाचा शपथविधी?
गुलाबराव पाटील
दादा भुसे
संजय राठोड
संदिपान भुमरे
उदय सामंत
तानाजी सावंत
अब्दुल सत्तार
दीपक केसरकर
शंभूराज देसाई





