BJP ने ब्राम्हण समाजात स्वीकृत नगरसदस्य पदाची संधी द्या : डॉ. सचिन बोधनी
PCMC समस्त ब्राम्हण संघाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तीन नावे आयुक्तांकडे सादर केली आहेत मात्र भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकमत होत नसल्याने अद्याप नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. येत्या सोमवारी दि. 15 जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा विषय मांडला जाणार असून एकूण दहा स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.
दरम्यान समस्त ब्राम्हण संघाच्या वतीने भाजपाकडून ब्राम्हण समाजाला स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत संस्थापक अध्यक्ष डॉ. सचिन बोधनी यांनी माहिती दिली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये ब्राम्हण समाजाचे दोन लाखांहून अधिक नागरिक वास्तव्य करतात.शिवाय बहुतांश ब्राम्हण समाज हा सदैव भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवून देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत, पिंपरी चिंचवड शहराच्या जडणघडणीमध्ये ही ब्राह्मण समाजाचा मोलाचा वाटा आहे विविध क्षेत्रांमध्ये ब्राह्मण समाजाच्या नागरिकांनी शहराचे व राज्याचे नाव उंचावले आहे.
हेही वाचा
पंतप्रधान मोदींच्या यशस्वी तपपूर्ती निमित्त जनकल्याण शिबीर!
शहराच्या विकासामध्ये योगदान देण्यासाठी तसेच सर्व समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सात स्वीकृत सदस्यांमध्ये ब्राम्हण समाजाला एका स्वीकृत नगरसदस्य पदावर संधी द्यावी अशी मागणी समस्त ब्राम्हण संघांचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सचिन बोधनी यांनी केली आहे.
स्वीकृत सदस्य पदासाठी ब्राम्हण समाजाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातूर्डेकर, विवेक इनामदार, मिलिंद वैद्य, भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते महेश कुलकर्णी, अतुल इनामदार इत्यादी असे अनेक मान्यवर हे पात्र असून त्यांचा या पदासाठी विचार व्हावा अशी मागणी डॉ. बोधनी यांनी केली आहे.
“पिंपरी-चिंचवडच्या जडणघडणीत ब्राम्हण समाजाचा मोलाचा वाटा असून हा समाज सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी प्रामाणिक राहिला आहे. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या या समाजाला स्वीकृत नगरसेवक पदावर न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे, ही आमची ठाम मागणी आहे.”
– डॉ. सचिन बोधनी, संस्थापक अध्यक्ष, समस्त ब्राम्हण संघ.





