Uncategorizedपिंपरी / चिंचवड
हिंजवडीचे ग्रामदैवत म्हातोबा मंदिरातील दानपेटी फोडली
![ The donation box of Mhatoba temple, the village deity of Hinjewadi, was broken](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/chori01-2.jpg)
पिंपरी चिंचवड | हिंजवडीचे ग्रामदैवत श्री म्हातोबा मंदिर येथील दानपेटी फोडून चोरट्याने 17 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना हिंजवडी येथे गुरुवारी (दि. 29) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास घडली.
मुराजी नारायण वाघमारे (वय 50, रा. लक्ष्मी मंदिराजवळ, हिंजवडी गावठाण) यांनी गुरुवारी (दि. 29) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास हिंजवडीचे ग्रामदैवत श्री म्हातोबा मंदिर येथील दानपेटीचे कुलूप दोन चोरट्यांनी तोडले. त्यानंतर दानपेटीतील 17 हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.