ठाकरेंची तिसरी पिढी सुद्धा मुंबईकरांना दिलासा देण्यात अपयशी, नवनीत रवी राणा यांचा घणाघाती आरोप
![ठाकरेंची तिसरी पिढी सुद्धा मुंबईकरांना दिलासा देण्यात अपयशी, नवनीत रवी राणा यांचा घणाघाती आरोप](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Untitled-design-61.jpg)
मुंबई: महानगर पालिकापाण्यात बुडाली आहे. ठाकरेंची तिसरी पिढी असफल झाली आहे. महानगर पालिकेच्या पावसाळापूर्व नियोजनाचे तीनतेरा वाजले आहेत. ‘माझी मुबंई माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या ठाकरे परिवाराच्या अनागोंदी कारभारामुळे सर्व मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशी टीका खासदार नवनीत रवी राणा यांनी केली आहे.
मुंबईतील मिठी नदीची स्वच्छता, गटारे साफ करणे, भूमीगत गटार योजना आदींवर दरवर्षी अरबो रुपये खर्च करूनही दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना त्रास का? असा संतप्त सवाल खासदार नवनीत रवी राणा यांनी केला आहे.
पुढे नवनित राणा म्हणाल्या केंद्र सरकारने संसदीय समिती स्थापन करून मुंबई महानगर पालिकेच्या या अवाजवी खर्चाचे थर्ड पार्टी ऑडिट करावे म्हणजे यातील उधळपट्टी व नेमके लाभार्थी कोण? हे बाहेर येईल. महाराष्ट्र शासनाच्या बरोबरीचे अर्थसंकल्पीय बजेट असणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या या अनागोंदी कारभाराला शिवसेनाच जबाबदार असून ठाकरें ची तिसरी पिढी सुद्धा मुंबईकरांना दिलासा देण्यात अपयशी ठरल्याचा घणाघाती आरोप खासदार नवनीत रवी राणा यांनी केला आहे.
देशभरात मुंबईची होणारी बदनामी व मुंबई महानगर पालिकेच्या खराब प्रतिमेबद्दल आपल्याला अति दुःख होत असल्याचे सुद्धा खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. मुंबई ही तुंबई होऊ नये म्हनून आपण केंद्रीय स्तरावर प्रयत्न करू असेही खासदार नवनीत रवी राणा यांनी म्हटले आहे.