ध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी आज, शुक्रवारपासून दहा वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
मुंबईः मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी आज, शुक्रवारपासून दहा वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण, बदलापूर आणि ठाणेदरम्यान या लोकल फेऱ्या धावणार आहेत. यात आठ जलद आणि दोन धीम्या लोकलचा समावेश आहे. या फेऱ्यांनंतर मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ५६ वरून ६६ होणार आहे. साध्या लोकल फेऱ्यांच्या जागी वातानुकूलित लोकल धावणार आहेत. मध्य रेल्वेच्या एकूण लोकल फेऱ्यांची संख्या १,८१० इतकीच राहणार असून, यात कोणतीही वाढ होणार नाही.
वातानुकूलित लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक
ठाणे-सीएसएमटी सकाळी ०८.२० (जलद)
सीएसएमटी-बदलापूर सकाळी ०९.०९ (जलद)
बदलापूर-सीएसएमटी सकाळी १०.४२ (जलद)
सीएसएमटी-कल्याण दुपारी १२.२५ (जलद)
कल्याण-सीएसएमटी दुपारी ०१.३६ (जलद)
सीएसएमटी-ठाणे दुपारी ०३.०२ (धीमी)
ठाणे-सीएसएमटी दुपारी ०४.१२ (धीमी)
सीएसएमटी-बदलापूर सायंकाळी ०५.२२ (जलद)
बदलापूर-सीएसएमटी सायंकाळी ०६.५५ (जलद)
सीएसएमटी-ठाणे रात्री ०८.३० (जलद)