सिद्धार्थ जाधव प्रवासादरम्यान करतो ‘ही’ गोष्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
![Siddharth Jadhav doing 'this' thing during travel, sharing the video said...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/siddharth-jadhav-780x461.jpeg)
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते. तो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ जाधवचे एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित झाले. त्याचा ‘तमाशा लाईव्ह’, ‘दे धक्का २’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. सिद्धार्थ जाधव हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. नुकतंच सिद्धार्थने त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
सिद्धार्थ जाधव हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने त्याला प्रवासादरम्यान कोणती गोष्ट करायला आवडते याबद्दल खुलासा केला आहे. सिद्धार्थ हा विविध ठिकाणी प्रवास करत असतो. काही महिन्यांपूर्वी सिद्धार्थने त्याच्या लेकीसह दुबई टूर केली होती. सध्या तो एका हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यातच त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
या व्हिडीओ तो त्याच्या गाडीतून प्रवास करताना दिसत आहे. यावेळी तो ८० आणि ९० च्या दशकातले एक नावाजलेले गायक मोहम्मद अझीझ यांचे एक गाणे गुणगुणताना दिसत आहे. त्याच्या प्ले लिस्टमध्ये हे गाणं सुरु असून तो ते गाणे बोलताना दिसत आहे. ‘दिल बेहलता है मेरा … आप के आ जाने से..’ अशा या गाण्याच्या ओळी आहेत याला कॅप्शन देताना त्याने याच गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत. #आपलासिध्दू