क्षण संस्थेचा अध्यक्ष असल्याची थाप मारत एका भामट्याने चक्क दुसऱ्याचीच इंग्रजी शाळा डॉक्टरला विकल्याचा धक्कादायक प्रकार…
औरंगाबाद: शिक्षण संस्थेचा अध्यक्ष असल्याची थाप मारत एका भामट्याने चक्क दुसऱ्याचीच इंग्रजी शाळा डॉक्टरला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भामट्याने डॉक्टरची १६ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वनाथ माधवराव तरटे वय-५५ (रा. कमलेश हाऊसिंग सोसायटी, नाजरीन चर्चच्या बाजूला, एन-६ सिडको) असे आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी डॉ. अफसर खान जुम्मा खान (रा. रोशनगेट,आझम कॉलनी) यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. १९ ऑगस्ट २०१४ ते आजपर्यंत आरोपीने अश्वघोष शैक्षणिक व व्यायाम शाळा संस्थेचा अध्यक्ष असून संस्थेची स्प्रिंगडेल इंग्लिश स्कूल विक्री असल्याचे सांगितले.
डॉ. खान यांनी करार करून इंग्लिश स्कूल विकत घेण्याची तयारी दर्शवली व तरटे यांना तब्बल १६ लाख रुपये दिले. मात्र त्यानंतर विश्वनाथ तरटे हा संस्थेचा अध्यक्ष नसल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच खान यांनी सिटी चौक पोलिसात फिर्याद दिली आहे.