breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘केक’ ऑनलाईन मागविणे पडलं महागात; महिलेच्या बँकखात्यातून तब्बल १ लाख ६७ हजार गायब

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणूकीच्या घटनेत मोठी वाढ होत आहे. मोशी येथील एक महिला देखील अशा ऑनलाईन फसवणूकीला बळी पडली आहे. तिने मागविलेल्या केकचे ऑनलाईन पेमेंट करताना बँक खात्यातून तब्बल १ लाख ६७ हजार २३० रूपये गायब झाले आहेत. फसवणूक झालेल्या संबंधित महिलेने याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात (दि.०२) गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी येथील डेस्टीनेशन ओस्टीया सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेने दि.०४ मार्च २०२२ रोजी केकस एन मोअर – ऑन केक डिलीवरी इन पुणे या वेबपेजवरून ऑनलाईन केकची ऑर्डर दिली. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने केकच्या ऑनलाईन पेमेंट करिता महिलेस व्हॉटस्अपव्दारे स्कॅनर पाठविला. महिलेने आपल्या मोबाईल फोनव्दारे तो स्कॅनर स्कॅन केला असता त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ६७ हजार २३० रूपये परस्पर ट्रान्सफर झाले.

ऑनलाईन पेमेंट करताना आपल्या बँक खात्यातून पैशांचा अपहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भोसरी एमआयडीसी पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पाटील करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button