दुचाकीच्या धडकेत एक जण गंभीर जखमी; काळजाचा धरकाप उडवणाऱ्या अपघाताचा VIDEO
![One seriously injured in a two-wheeler collision; VIDEO of a heartbreaking accident](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/One-seriously-injured-in-a-two-wheeler-collision-VIDEO-of-a-heartbreaking-accident.jpg)
हिंगोली | हिंगोली-परभणी राष्ट्रीय महामार्गावरील आसोला पाटीजवळ दोन दुचाकींच्या धडकेमध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. शेख हाजी शेख मुसा असं अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघाताची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असोला येथून शेख हाजी शेख मुसा हे त्यांच्या दुचाकी वाहनावर रात्री परभणीकडे निघाले होते. असोला पाटीजवळ पोहोचल्यानंतर दुसऱ्या एका दुचाकीने त्यांच्या वाहनाला धडक दिली. यामुळे त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते रस्त्यावर कोसळले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळाच्या
महिनाभरापूर्वी याच ठिकाणी दुचाकीवरुन जाणाऱ्या एका जोडप्याच्या वाहनालाही भीषण अपघात झाला होता. त्यामुळे अपघाताच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी या परिसरातील ग्रामस्थांसह वाहनधारकांनी केली आहे.
रस्ते सुरक्षासंदर्भात तातडीची बैठक
हिंगोली जिल्ह्यात मागील एक महिन्यात झालेल्या अपघाताच्या मालिकेनंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांनी रस्ता सुरक्षा संदर्भात ६ जून रोजी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला पोलीस विभाग, बांधकाम विभाग तसंच राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. यावेळी जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या अपघात स्थळांचे ब्लॅक स्पॉट जाहीर करून सदर ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना करणे, तसेच हिंगोली ते रिसोड या राष्ट्रीय मार्गावर काही ठिकाणी दुरुस्ती आवश्यक असून त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला यावेळी सूचना दिल्या जाणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.