जनसेवा–कल्याणाचा वादा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पॅनल मैदानात
मिशन–PCMC : पंकज भालेकर यांच्या नेतृत्वात पॅनलचा प्रचार

पिंपरी–चिंचवड : जनसेवा आणि सर्वसमावेशक विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ठाम वादा असून आगामी पिंपरी–चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 साठी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकवण्यासाठी पक्ष सज्ज झाला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत.
प्रभाग क्रमांक 12 साठी सर्वसाधारण पुरुष गटातून श्री. पंकज दत्तात्रय भालेकर, ओबीसी पुरुष गटातून श्री. शरद वसंत भालेकर, तर सर्वसाधारण महिला गटातून सौ. सिमा धनंजय भालेकर आणि सौ. चारुलता रितेश सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हेही वाचा – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंग केल्याच्या तब्बल 186 तक्रारी दाखल
स्थानिक विकास, मूलभूत सुविधा, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवर ठोस कामगिरी करण्याचा निर्धार या पॅनलने व्यक्त केला आहे. अनुभवी नेतृत्व, कार्यकर्त्यांची मजबूत फळी आणि जनतेशी असलेला थेट संपर्क याच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक 12 मध्ये विजय मिळवेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. निवडणूक प्रचारात जनतेपर्यंत विकासाचा आराखडा पोहोचवून विश्वास संपादन करण्यावर भर दिला जाणार असून “जनसेवा कल्याण” हा मंत्र घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल निवडणूक रिंगणात उतरले आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“पिंपरी–चिंचवडचा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन आणि प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नांना न्याय देणे हेच आमचे मिशन आहे. प्रभाग क्रमांक 12 मधील मूलभूत सुविधा, युवकांसाठी संधी, महिलांसाठी सुरक्षितता आणि सामाजिक न्याय यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जनतेच्या विश्वासावरच राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा महापालिकेत सत्तेवर येईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”
– पंकज भालेकर, उमेदवार, राष्ट्रवादी, प्रभाग- 12.



