Uncategorizedमहाराष्ट्रमुंबई

मोहित कंबोज यांच्या ‘त्या’ एका ट्विटमुळे पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर जाण्याची शक्यता

  • शिवसेनेची घटलेली ताकद लक्षात घेता त्यांच्याकडून प्रभावीपणे बाजू मांडली जाण्याची शक्यता फारच कमी
  • विरोधकांची सर्व मदार अजित पवार यांच्यासारख्या फर्ड्या वक्त्यावर होती
  • मोहित कंबोज यांच्या या वक्तव्याचा रोख अजित पवार यांच्या दिशेने
मुंबई  । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।  
मोहित कंबोज यांनी पावसाळी अधिवेशनाच्या आदल्या रात्री एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या नेत्यावर कारवाई होण्याचे संकेत दिले आहेत. पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट या कालावधी होणार आहे. यापैकी तीन दिवस सुट्ट्यांमध्ये जाणार असल्याने अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाज सहा दिवसांचेच असेल.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून अनेक मुद्द्यांवरून सरकारला घेरले जाण्याची शक्यता होती. अजित पवार  यांचा विधिमंडळातील अनुभव आणि त्यांचा आक्रमक बाणा पाहता ते अडचणीचे प्रश्न विचारून सरकारची कोंडी करू शकतात. गलितगात्र अवस्थेत असलेल्या काँग्रेस आणि अर्ध्यामुर्ध्या शिवसेनेकडे पाहता या अधिवेशनात विरोधकांची सर्व मदार राष्ट्रवादी काँग्रेसवर  असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार या अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी पुढाकार घेतील, असा अंदाज होता. मात्र, आता अधिवेशनापूर्वीच भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यावर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत. मोहित कंबोज यांच्या या वक्तव्याचा रोख अजित पवार यांच्या दिशेने असल्याचे सांगितले जाते. मोहित कंबोज यांचा आजवरचा लौकिक पाहता त्यांनी भाकीत केलेले बहुतांश नेते तुरुंगात गेले आहेत. त्यामुळे आता कारवाईच्या भीतीने पावसाळी अधिवशेनात अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर जाऊ शकतात, अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. 

पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट या कालावधी होणार आहे. यापैकी तीन दिवस सुट्ट्यांमध्ये जाणार असल्याने अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाज सहा दिवसांचेच असेल. त्यामुळे या सहा दिवसांमध्येच विरोधकांना शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरण्याची संधी आहे. शिवसेनेचे सभागृहातील घटलेले संख्याबळ लक्षात घेता त्यांच्याकडून प्रभावीपणे बाजू मांडली जाण्याची शक्यता फारच कमी आहे. अशावेळी विरोधकांची सर्व मदार अजित पवार यांच्यासारख्या फर्ड्या वक्त्यावर होती. परंतु, आता मोहित कंबोज यांनी सिंचन घोटाळ्यात मोठी कारवाई होण्याचे संकेत देत एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव आणल्याचे म्हटले जाते. त्यामुळे हे दडपण झुगारून अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पावसाळी अधिवेशनात सरकारवर तुटून पडणार का, हे पाहावे लागेल.मोहित कंबोज यांनी लवकरच पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा भांडाफोड करणार असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा तो नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटायला जाईल, असा इशारा कंबोज यांनी ट्विटमधून दिला. कंबोज यांनी एकूण तीन ट्विटस केली आहेत. यापैकी तिसऱ्या ट्विटमध्ये कंबोज यांनी २०१९ मध्ये परमबीर सिंग यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळा प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button