धुळ्यात मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
![MNS activists arrested in Dhule](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/dhule.png)
धुळे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर धुळ्यामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, धुळे पोलिसांनी वेळीच या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडून दडपशाही होत असून मनसेचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.
यावेळी मनसे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटापटही झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने काही तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सध्या संपूर्ण राज्याचे राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात हनुमान चालीसा पठण…
नंदुरबार मनसे जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांसदर्भात दिलेला अल्टिमेटम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नंदुरबार शहरातील धुळे नाका परिसरातील निंबाच्या झाडात साकारलेल्या हनुमान मंदिर जवळ हनुमान चालीसाचे पठाण केले. सदर परिसर अवलगाजी दर्गा जवळ आहे.