Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
Maharashtra Legislative Assembly’s Budget Session : राज्याच्या अर्थसंकल्प सर्व समाज घटकांना न्याय देणारा असेल : अजित पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Adhiveshan.jpg)
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारच्या वतीने सादर करण्यात येणारा यंदाचा अर्थसंकल्प सर्व समाजघटकांना न्याय देणारा असेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
महाविकास आघाडी सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. शेतकरी कर्जमाफी, सीएए, व एल्गार परिषद तपासाच्या मुद्यावर हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विधान भवन परिसरात सीएए, एनआरसी, एनपीआरला विरोध दर्शवण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये, विद्या चव्हान पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे यांनी बॅनर फडकावले आहेत. विरोधकांनी शेतकरी कर्जमुक्तीची मागणी करीत घोषणाबाजी सुरू केली आहे.