Uncategorized

काश्मीरमध्ये सुरक्षापथकांनी तीन दहशतवाद्यांचा केला खात्मा

ऑपरेशन आसनमध्ये मानव रहित वाहन आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर

काश्मीर : जम्मूच्या अखनूरमध्ये सोमवारी सुरक्षापथकांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. हल्ल्यानंतर सैन्याने लगेच ऑपरेशन आसन सुरु केलं. या ऑपरेशनसाठी सैन्याकडून कमांडोंना पाचारण करण्यात आलं. हेलिकॉप्टर आणि बीएमपी-II या लढाऊ वाहनांचा सुद्धा वापर करण्यात आला. पहिल्यांदाच दहशतवाद्यांविरुद्ध कुठल्या ऑपरेशनमध्ये बीएमपी-II हे रणगाडे वापरण्यात आले. इतकच नाही, आर्टिफिशियल इंटेलिजेंसची सुद्धा मदत घेण्यात आली. दहशतवाद्यांविरुद्ध ऑपरेशन संपल्यानंतर सैन्याकडून प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली. यात मेजर जनरल समीर श्रीवास्तव यांनी सांगितलं की, “ऑपरेशन आसनमध्ये आम्ही मानव रहित वाहन आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर केला. त्याचे आम्हाला चांगले रिझल्ट मिळाले. दहशतवाद्यांविरुद्धच्या या ऑपरेशनमध्ये सैन्याने त्यांचा एक लष्करी श्वान गमावला”

सर्च ऑपरेशन सुरु असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात फँटम डॉगने देशासाठी बलिदान दिलं असं मेजर जनरल समीर श्रीवास्तव यांनी सांगितलं. फँटम डॉगच्या बलिदानामुळे अनेकांचे प्राण वाचले. ऑपरेशनमध्ये बीएमपी रणगाड्याच्या वापराबद्दलही त्यांनी माहिती दिली. दुर्गम भाग असल्याने आम्ही रणगाडा उतरवला. 30 डिग्रीची उतरण आणि घनदाट जंगलात दहशतवाद्यांचा ठिकाणा कळल्यानंतर तिथे पोहोचण्यासाठी रणगाड्याचा वापर केला. दहशतवाद्यांविरुद्धच्या या ऑपरेशनमध्ये फँटम डॉग शहीद झाला.फँटम आमचा खरा नायक होता. तो शूर होता. त्याच्या सर्वोच्च बलिदानाला आमचा सलाम, असं सैन्याने म्हटलं आहे. फँटमच साहस, निष्ठा आणि समर्पण हे गुण कधी विसरता येणार नाहीत, असं सैन्याने म्हटलं आहे.

मृत्यूपूर्वी फँटमकडून महत्त्वाचं कार्य
फँटम हा बेल्जियन मेलिनोइस ब्रीडचा डॉग होता. ऑगस्ट 2022 मध्ये त्याला या क्षेत्रात तैनात करण्यात आलं होतं. फँटम अनेक महत्त्वाच्या मिशनचा भाग होता. फँटमचा जन्म 2020 मध्ये झाला होता. त्याला भारतीय सैन्याच्या रिमाउंट वेटरनरी कोर केंद्रातून पाठवण्यात आलं होतं. अखनूरमध्ये सर्च ऑपरेशन दरम्यान फँटमने लपवलेल्या स्फोटकांचा शोध लावला. त्यामुळे सैनिकांना घेराबंदी मजबूत करता आली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button