दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या हिंजवडी शाखेचा सोळावा वर्धापन दिन उत्साहात
पिंपरी : दिलीप सोनिगरा ज्वेलर्स प्रा. लि. या सराफी पेढीच्या हिंजवडी शाखेचा 16 वा वर्धापन दिन शुक्रवारी (दि. 25 मार्च) उत्साहात साजरा झाला. वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांना खास बक्षिसे देण्यात आली. सोने आणि चांदीच्या खरेदीवर दिलीप सोनिगरा ज्वेलर्सकडून आकर्षक बक्षिसांचे गिफ्ट देण्यात आले.
दिलीप सोनिगरा ज्वेलर्स प्रा. लि. चे मालक दिलीप शेठ सोनिगरा यांनी 25 मार्च 2006 रोजी दिलीप सोनिगरा ज्वेलर्स या दुकानाचे दुसरे रोप हिंजवडी येथे लावले. हे रोप आता 16 वर्षांचे झाले आहे. मावळ आणि मुळशी तालुक्यातील सर्व स्तरातील ग्राहकांनी तसेच हिंजवडी, माण सारख्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील उच्च शिक्षित ग्राहकांनी दिलीप सोनिगराच्या हिंजवडी शाखेला भरभरून प्रेम दिले. सर्व ग्राहकांच्या प्रतिसादाच्या जोरावर हिंजवडी शाखेने ग्राहक सेवेची 16 वर्ष यशस्वीपणे पूर्ण केली.
ग्राहकांच्या आणि कर्मचा-यांच्या साथीच्या जोरावरच आजवरचा प्रवास यशस्वी झाला आहे. तसेच आम्ही हिंजवडी शाखेचा 16 वा वर्धापन साजरा करत असल्याचे सोनिगरा ज्वेलर्सचे मालक दिलीप सोनिगरा सांगतात. आम्ही आमच्या सर्व ग्राहकांचा, हितचिंतकांचा व सहका-यांचे मनःपूर्वक आभार मानतो. प्रार्थना करतो कि सर्वांची साथ यापुढे देखील अशीच कायम सोबत राहील, असेही दिलीप सोनिगरा म्हणाले.
दिलीप सोनिगरा ज्वेलर्समध्ये सर्व प्रकारचे सोने, चांदीचे दागिने 91.6 हॉलमार्कचे असतात. टेम्पल ज्वेलरी, अॅंटिक ज्वेलरी, ट्रेडीशनल ज्वेलरी व ईतर सर्व प्रकारच्या सोन्या-चांदीचे दागिने दिलीप सोनिगरा ज्वेलर्समध्ये तयार मिळतात. दिलीप सोनिगरा ज्वेलर्स ग्राहकांना सोने, चांदी, हिरे यांच्या शुद्धतेचा विश्वास देते.
दुकानाच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त 25 ते 27 मार्च 2022 या कालावधीत पाच हजार रुपयांच्या पुढील चांदी खरेदीवर आणि 10 रुपयांच्या पुढील सोने खरेदीवर दिलीप सोनिगरा ज्वेलर्सकडून ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.