Uncategorizedताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

कोकणसाठी महत्त्वाची अपडेट; या दोन घाटांतील वाहतुकीबाबत मोठे निर्णय

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रघुवीर घाट व रसाळगड हा पावसाळ्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पर्यटकांची पर्यटनासाठी मोठी गर्दी असते. पण रघुवीर घाट व रसाळगड रस्ता व डोंगर भागालगत दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन खेड तालुका प्राशासनाने तातडीने पाऊले उचलत १ जुलैपासून हा घाट पावसाळ्यात किमान दोन महिने वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. खेड उपविभागीय प्रांताधिकारी राजश्री मोरे यांनी हे आदेश जारी केले आहेत.

पावसाळा सुरू झाल्याने खोपी शिरगाव येथील रघुवीर घाट व डोंगर भागालगत दरड कोसळून जीवितहानी होऊ नये यासाठी तुर्तास ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक होते. रघुवीर घाट व रसाळगड या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी गर्दी वाढत चालली आहे. दुसरीकडे पावसाळ्यामध्ये छोट्या-मोठ्या दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने या मार्गावरील वाहतूक धोकादायक होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये दरड कोसळून जीविताला धोका उद्भवण्याची शक्यता आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांनी खेड उपविभागातील खोपी शिरगाव येथील रघुवीर घाट व मौजे घेरारसाळगड येथील रसाळगड हा मार्ग आदेशाच्या तारखेपासून पुढील दोन महिने पर्यटनासाठी बंद करत आहे, असे आदेशात नमूद केले आहे.

वरंध घाटातील अवजड वाहतूक तीन महिने बंद

रायगड जिल्ह्यातील महाड मार्गावरील वरंध घाटात वाघजाई मंदिराजवळ दरड कोसळल्याने येथील रस्त्याशेजारी असलेल्या ७ टपरीवजा दुकानांना नोटिसा जारी करण्यात याव्यात, असे महाड प्रशासनाने भोर तालुका प्रशासनाला कळवले आहे. त्यामुळे हा घाटही सध्या धोकादायक ठरू शकतो, अशी भीती वाहनचालक व्यक्त करत आहेत.

महाड मार्गावरील वरंध घाटात वाघजाई मंदिराजवळ बुधवारी दरड कोसळली. या दरडीखाली दबल्याने एक जण जखमी झाला आहे. रेस्क्यू टीमच्यामदतीने दीड तासाच्या प्रयत्नानंतर जखमी तरुणाला वाचवण्यात यश आले आहे. महाडच्या ग्रामीण रुग्णालयात जखमीवर उपचार सुरू आहेत. पुणे- महाड मार्गावरील वरंध घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

आता महाड ते भोर दरम्यानचा वरंध घाट हा पुढील तीन महिने ३० सप्टेंबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. महाड ते पुणे मार्गावरील वरंध घाट हद्दीतील सुमारे २१ किलोमीटरचा मार्ग हा अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. या घाटाला पर्यायी मार्ग म्हणून महाड- माणगाव-ताम्हाणी घाटामार्गे प्रवास करण्याच्या सूचना रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button