कराडमध्ये मध्यरात्री भीषण आग! सिलिंडरचे स्फोट, २५ घरे बेचिराख
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/fire-flames-red-2821775.jpg)
कराड | कराड शहराच्या मध्यवर्ती भागातील टाऊन हॉल जवळ शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली. त्यात चार सिलिंडरचे स्फोट झाल्यामुळे ती आणखी भडकली. याची माहिती मिळताच कराड नगरपालिका आणि कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी अनेक तास आगीशी झुंज देऊन पहाटे ४.३० च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले.
आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र २ महिला किरकोळ जखमी झाल्या. यात २० ते २५ घरे जळून खाक झाली.
कराड बसस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या वेश्या वस्तीला शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली. तेथे चार गॅस सिलिंडरचे स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे घाबरलेले रहिवासी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत सुटले. यामुळे तेथे गोंधळ निर्माण झाला होता. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी निकराची झुंज देऊन पहाटे ४.३० वाजता आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत २० ते २५ घरे जळून खाक झाली.