रोगप्रतिकारक शक्तीच्या मजबुतीसाठी नागरिकांनी दररोज योगासने करावीत: दिनेश यादव
![Citizens should do yoga every day to strengthen the immune system: Dinesh Yadav](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/रोगप्रतिकारक-शक्तीच्या-मजबुतीसाठी-नागरिकांनी-दररोज-योगासने-करावीत-–-दिनेश-यादव.jpg)
पिंपरी : रोगप्रतिकारक शक्तीच्या मजबुतीसाठी नागरिकांनी रोज योगासने करावीत असे मत माजी स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी व्यक्त केले. आताच्या घडीला संपूर्ण जगावर करोनाचे सावट आहे. त्यामुळे योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आज आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त कुदळवाडीत योग प्राणायम शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थितांना पतंजली योग समितीचे प्रशिक्षक योग, प्राणायाम व ध्यानाचे धडे शिकविण्यात आले. रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, मनाचे सामर्थ्य वाढवून सकारात्मक विचार उत्पन्न व्हावेत, यासाठी योगसाधना उपयुक्त मानली जाते.
त्यामुळे आंतराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने कोरोनाकाळात अधिकाधिक लोकांनी या योग शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर व आमदार पै.महेशदादा लांडगे युवा मंच, कुदळवाडीच्या वतीने स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांनी केले होते. यावेळी उपस्थित अमित तापकीर, स्वप्निल डावकरे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.