जंगलात पेटलेल्या वणव्यामुळं दक्षिण- पश्चिम युरोपात भीषण उष्णतेमुळं नागरिक हैराण
![Citizens are shocked due to severe heat in South-West Europe due to forest fires](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Citizens-are-shocked-due-to-severe-heat-in-South-West-Europe-due-to-forest-fires.jpg)
लंडनः जंगलात पेटलेल्या वणव्यामुळं दक्षिण- पश्चिम युरोपात भीषण उष्णतेमुळं नागरिक हैराण झाले आहेत. काही ठिकाणीतर उष्णतेमुळं लोकांना जीवही गमवावे लागले आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजापेक्षाही ब्रिटनमध्ये अधिक तापमान वाढलेले आहे. युरिपियन देशातील तापमानाशी भारताशी तुलना करायची झाल्यास मागील दहा वर्षांपेक्षा अधिक आहे. नागरिकांबरोबर ब्रिटनमधील वास्तू व बांधकामांवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
मंगळवारी ब्रिटनचे तापमान ४१ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले होते. हे तापमान इतके जास्त होते की ब्रिटनमधील रनवेदेखील उष्णतेमुळं वितळले होते. सोमवारी लंडनपासून ५० किलोमीटर दूर असलेल्या ल्यूटॉन विमानतळावरील विमान रद्द करण्याची वेळ आली. अधिक उष्णतेमुळं रनवेचा काही भाग खराब झाले होते. तापमान वाढल्यामुळं रेनवेवर परिणाम झाला होता. रनवेचा पृष्ठभागाचे नुकसान झाले होते. काही तासांनंतर त्यावर काम करुन परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
लंडनमधील मिडिलँड्स रेल्वेने सोमवारी लोकांना गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं अवाहन केलं होतं. रेल्वे रुळहे हवेच्या तुलनेत २० अंश अधिक गरम असतात. म्हणजेच तापमान वाढले तर रूळांना धोका पोहचू शकतो. लंडनमध्ये ट्रेन २०० किलोमीटर प्रतितास वेगाने धावते, असं रेल्वे प्रशासनाने म्हटलं होतं.
मंगळवारी काही ट्रेन रद्द करण्यात आल्या तर काही ठिकाणी रेल्वेचा वेग ३० किलोमीटर प्रतितास याप्रमाणे कमी करण्यात आला. रस्ते व रनवे वितळत आहे. रेल नेटवर्कही विस्कळीत होत आहे, असं ब्रिटनचे परिवहनमंत्री ग्रँट शॅप्स यांनी म्हटलं आहे.
तापमान वाढीचे कारण काय?
पूर्व इंग्लडमधील कॉनिनगस्बेमध्ये सगळ्यात पहिले ४०.०३ डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली होती. हवामान बदलामुळं तापमानात वाढ होत आहे, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. संपूर्ण जगभरात उष्णतेच्या लाटा येत आहेत. येणाऱ्या काळात ही उष्णता अधिक वाढेल. पण ही स्थिती सामान्य असेल. तापमान वाढीचे कारण हे हवामान बदल आहे, असं एका अहवालात नमूद करण्यात आलं आहे.