Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये जाहीर सभा; आमदार अमित गोरखे यांची माहिती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून प्रचाराला वेग आला असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भव्य जाहीर सभा पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित करण्यात आली आहे.

ही जाहीर सभा शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता, आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरात पार पडणार आहे. या सभेमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.

हेही वाचा –  रहाटणी प्रभाग क्र.२७ मधील भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा: आमदार सुरेश धस यांचे मतदारांना आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राबविण्यात आलेल्या विकासकामांचा आढावा, तसेच पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप यावेळी मांडण्यात येणार आहे. या सभेला पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या जाहीर सभेच्या आयोजनाबाबतची माहिती आमदार अमित गोरखे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे पिंपरी-चिंचवडमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, ही सभा आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button