गाडीचा टायर फुटला, ड्रायव्हरचा तोल सुटला, १ जण जागीच ठार, कारचा चेंदामेंदा
![Car tire ruptures, driver loses balance, 1 killed on the spot, car crashes](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Car-tire-ruptures-driver-loses-balance-1-killed-on-the-spot-car-crashes.png)
बुलढाणा |शेगाववरून अकोटकडे जाणाऱ्या कारचे समोरील टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. लोहारा गावजवळ हा अपघात झाला. अनियंत्रित झालेल्या कार रस्त्यावरून खाली उतरून शेतात जाऊन पलटली. या अपघातात चारचाकी उलटून कारचा चेंदामेंदा झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना शेगावच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
लेनिया कंपनीची कार एमएच २८ व्ही १३५७ ही कार भरधाव वेगाने शेगाववरून अकोटकडे जात असताना बाळापूर तालुक्यातील लोहारा गावाजवळ कारच्या समोरील टायर फुटला. त्यामुळे अनियंत्रित झालेली कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात जाऊन आदळली. कारची धडक होताच कारने दोन पलट्या खाल्ल्या त्यात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात संजय लक्ष्मण शेंडे (वय ६० राहणार जगदंबा नगर शेगाव) हे जागीच ठार झाले तर कार मधील तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना शेगावच्या एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.