पोटनिवडणूक अपडेट: कसब्यात तिसऱ्या फेरीत रवींद्र धंगेकर ६७७ हजार मतांनी आघाडीवर
![By-election update: Rabindra Dhangekar is leading by 677 thousand votes in the third round in Kasbay](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Untitled-design-61-780x470.png)
- १५ ते २० हजार मतांनी धंगेकर जिंकून येतीलः प्रशांत जगताप
पुणे ः
कसब्यात आमदार मुक्ता टिळक तर चिंचवडमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली. ही निवडणूक भाजपसह व महाविकास आघाडीकडून कधी नव्हे इतकी प्रतिष्ठेची करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी दोन्ही गटाचे दिग्गज नेतेमंडळींनी प्रचारात सहभाग घेतला होता. त्यामुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. प्रचाराच्या रणधुमाळीत तापलेले वातावरण मतदानानंतरही शांत होण्याचे नाव घेताना दिसत नाही. दरम्यान, कसब्यात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन्ही उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्यात आले. भाजपने पैसे वाटल्याचे आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आले. मारहाणीच्याही घटना कसब्यात घडल्या. त्यानंतर काल निकाल लागण्यापूर्वीच आमदार म्हणून भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचे फ्लेक्सही लागले होते.विविध कारणांनी कसब्याची पोटनिवडणून राज्यात गाजत आहे.
कसबा पोटनिवडणुकीत कोण गुलाल उधळणार याविषयी मागील काही दिवसांपासून लागलेल्या उत्सुकतेचे उत्तर आज मिळणार असून निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.पहिल्या राऊंडपासून सुरु झालेला सिलसिला शेवटपर्यंत राहील. कमीत कमी १५ ते २० हजार मतांनी धंगेकर जिंकून येतील, असा विश्वास प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला आहे.