BREAKING : इंदौरहून पुण्याला येणारी बस नर्मदा नदीत कोसळली, १३ जणांचा मृत्यू
![BREAKING: Bus coming from Indore to Pune falls into Narmada river, 13 dead](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/BREAKING-इंदौरहून-पुण्याला-येणारी-बस-नर्मदा-नदीत-कोसळली-१३.jpg)
पुणे : मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील घागरगाव इथे मोठी दुर्घटना घडली आहे. ४० प्रवासी घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. यासोबतच १५ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. खलघाट येथील संजय सेतू येथे हा अपघात झाला. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. ही बस महाराष्ट्र रोडवेजची असल्याचे खासदार गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले.
बस इंदौरहून पुण्याला जात होती. नर्मदा नदीच्या पुलावर ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. तपासानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. ते म्हणाले की, नदीचा प्रवाह अतिशय वेगवान आहे. बसमध्ये ५०-५५ जण होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
महत्त्वाचे अपडेट्स…
– इंदोरवरून पुण्याला येताना ही घटना घडली.
– बचाव कार्यासाठी एनडीआरएफ व एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे
– बसचा नंबर MH 40 N9848
– आत्तापर्यंत सहा जणांना रेस्क्यू ऑपरेशन करून बाहेर काढण्याची सूत्रांची माहिती..
– बचाव कार्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील एका जवांणाचा समावेश.
– उर्वरित प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न सुरू .
– आज सकाळी साडेदहा वाजताची घटना