Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

अजित पवारांचा वाढदिवस कट्टर आमदाराकडून अनोख्या पद्धतीनं साजरा, मुलींच्या शिक्षणासाठी हातभार

अकोला : कोरोनाच्या संसर्गामुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. अनेक विद्यार्थी पुन्हा आनंदानं शाळेत जाऊ लागले आहेत. पण अजूनही ग्रामीण भागात शिक्षणासाठी विद्यार्थांना कितीतरी किमी पायपीट करून जावं लागतं, अजूनही मुबलक सुविधा त्यांना मिळत नाहीत. अकोला जिल्ह्यातील रोहणखेड़ गावातल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती अशीच आहे. या विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासाठी पालकांकड़े सायकलचा हट्ट धरला, मात्र कुटुंबाची परिस्थिती पाहता आई-वडिलांना सायकल घेणं शक्य झालं नाही. या विद्यार्थ्यांनी आमदार अमोल मिटकरींकडे धाव घेतली अन् गावात बससेवा सुरू करा, अशी मागणी घातली. या विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण होईपर्यंत मिटकरींनी आगळीवेगळी भेट दिली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधत अमोल मिटकरी यांनी १५ विद्यार्थिनींना सायकल भेट दिल्या.

सध्या शहरातील मुला मुलींना घराततून मिळणाऱ्या शाळेसाठी सोयीसुविधा अधिक आहे. मात्र अजूनही ग्रामीण भागात हातमजूरीवर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरु आहे. अशात त्यांना शिक्षणासाठी कितीतरी किमी पायपीट करून जावं लागतं, अजूनही मुबलक सुविधा मिळतं नाही. अकोला जिल्ह्यातील रोहणखेड़ गावातल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती अशीच, त्यांना शिक्षणासाठी तब्बल ४ किमी पायपीट करावी लागते. कुटासा गावातील श्री शिवाजी विद्यालय असा प्रवास त्यांच्या दररोजचा प्रवास करावा लागतो. शाळेत जाण्यासाठी ना गावात बस आहे, ना कुठले वाहन. जर वाहन मिळाले तर प्रवासी पूर्ण भरेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रतीक्षा या विद्यार्थ्यांना करावी लागते. रोहनखेड ते कुटासा पर्यत बस सुरू करा, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्याकडे केली. मात्र आता या विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण होईपर्यंत अमोल मिटकरींनी आश्वासन म्हणून त्यांना वेगळी भेट दिली आहे. या मुलां-मुलीला शाळेत जाण्यासाठी नवी कोरी सायकल भेट दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या डोक्यावर काहीसा भार कमी झाला आहे.

या सर्व गोष्टींना निमित्त ठरलं ‘अजित पवार यांचा ‘ वाढदिवस…

आज अजितदादांचा वाढदिवसानिमित्त रोहणखेडच्या पंधरा मुला-मुलींना नविन सायकली भेट दिल्या, यावेळी गावातील २८० नागरिकांना डिजिटल यंत्राद्वारे डोळे तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात केले आहे. तसेच कुटासामधील १४८ वर्ष जुन्या जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शाळेच्या कामाची पाहणी केली, अन् शाळेसाठी स्थानिक आमदार विकास निधीतून वीस लक्ष रुपयांचा निधी दिला. विद्यार्थ्यांसाठी चांगले क्रीडांगण, सभागृह व चांगल्या वर्गखोल्या लवकरच निर्माण होतील. असे आश्वासनही दिलं.

आजची मदत, वडिलांचा बराचसा भार कमी करणारी..

आमच्या घरापासून शाळा ४ किमी अंतरावर आहे. शाळा दूर असल्याने शाळेत जायाचा प्रश्न फार गंभीर होता, आता त्यात पावसाळा सुरु झाला. पण आज अमोल दादाच्या मदतीने आम्हा मुला मुलींना सायकल मिळाली आहे. यामुळे आमच्या वडिलांचा बराचसा भार कमी होईल, असं विद्यार्थ्यांनी यावेळी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button