Uncategorized
पेट्रोल-डिझेलनंतर मुंबईत सीएनजी, पीएनजी महागले
![General civic concern; CNG, PNG expensive](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/cng-6.jpg)
मुंबई – पेट्रोल-डिझेलनंतर आता मुंबईतही सीएनजी आणि पीएनजी महागले आहेत. ही दरवाढ आजपासून शहरात लागू झाली आहे. त्यानुसार महानगर गॅस लिमिटेडचा पाईप गॅस प्रति युनिट ५५ पैसे आणि सीएनजी प्रति किलो २ रुपये ५८ पैशांनी महागला आहे. याचा फटका महानगरचा गॅस वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना आणि सीएनजी वाहनचालकांना बसणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने सामान्य वाहनचालक हैराण झाले होते. त्यानंतर एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली होती. या दोन्ही काळात सीएनजी आणि पीएनजी गॅसधारकांना दिलासा मिळाला होता. परंतु आता त्यांचीही दरवाढ झाली आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये महानगर गॅस आणि सीएनजी महागले होते.