Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लग्न होऊनही माझ्या मुलाशी अफेअर, आईचे बोचरे शब्द, विवाहित प्रेयसीची आत्महत्या

अमरावती: मोर्शी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३२ वर्षीय विवाहितेने २३ दिवसांपूर्वी गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणात मृतक महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून शिरखेड पोलिसांनी एका ४५ वर्षीय महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मृतक विवाहितेचे गावातीलच एका युवकाशी प्रेमसंबंध होते. ही माहिती त्या युवकाच्या आईला मिळाली. त्यामुळे युवकाची आई ७ मे रोजी सायंकाळी त्या महिलेच्या घरी गेली. मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून युवकाच्या आईने विवाहितेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केला. तसेच, ‘तुला हे शोभतं का? तू मरून जा’, असे म्हटले. त्यानंतर त्या युवकाची आई विवाहितेच्या घरातून निघून गेली.

या प्रकारामुळे विवाहितेच्या मनावर वाईट परिणाम झाला आणि तिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. अशी तक्रार मृतक विवाहितेच्या पतीने शिरखेड पोलिसांत दिली होती. याप्रकरणी चौकशीअंती शिरखेड पोलिसांनी विवाहितेच्या घरी जाऊन वाद घालणाऱ्या युवकाच्या आईविरुद्ध सोमवारी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पती फोनवर बोलत होता, तेवढ्यात पत्नीला ट्रेनने उडवलं; रुळावर जाईपर्यंत सगळं संपलं होतं

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button