breaking-newsTOP NewsUncategorizedआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

चीनमधील ४२ मजली इमारतीला भीषण आग, आग लागलेल्या इमारतीमध्ये प्रमुख सरकारी कंपनीचं कार्यालय

बीजिंग । महान्यूज । वृत्तसंस्था ।

चीनमधील चँगशा शहरातील एका उत्तुंग इमारतीला मोठी आग लागली आहे. चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सध्या तरी या अपघातामधील मृतांची आकेडवारी समोर आलेली आहे. चँगशा शहर हे हुनान प्रांताच्या राजधानीचं शहर आहे. आग लागलेल्या इमारतीमध्ये प्रमुख सरकारी कंपनीचं कार्यालय असल्याची माहितीही समोर आली आहे.

चीनमधील सरकारी वृत्तवाहिनी असणाऱ्या सीसीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, “आग लागलेल्या इमारतीच्या सर्व बाजूने धूर निघत आहे. अनेक मजल्यांवर ही आग पसरली आहे,” असं स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे. आग विजवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु आहेत असंही प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे. ही इमारत ४२ मजल्याची आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button