Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
लालबागच्या राजाच्या मुखदर्शनसाठी भाविकांची मोठी गर्दी

मुंबई । महाईन्यूज ।
मुंबईतील लालबागचा राजा गणेशाच्या यंदाच्या मूर्तीचं सोमवारी संध्याकाळी 7 वाजता अनावरण झाले. लालबागच्या राजाचे पहिले रुप पाहण्यासाठी म्हणजेच मुखदर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. लालबागच्या राजाचे हे 89 वे वर्ष आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी यासाठी अयोध्येतील राम मंदिराचा देखावा साकारला आहे.





