Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये अर्ली डिटेक्शन सिस्टीम सुरू

महापालिकेकडून “पर्जन्यमान व पूर अंदाज-पुर्वसूचना प्रणाली” कार्यान्वित

पिंपरी-चिंचवड | पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग (C-DAC), पुणे यांच्या सहकार्याने प्रगत “पर्जन्यमान व पूर अंदाज – पुर्वसूचना प्रणाली (अर्ली डिटेक्शन सिस्टीम)” कार्यान्वित करण्यात आली आहे.

या उपक्रमाचा उद्देश हवामान, वायू गुणवत्ता आणि पूर यांचे अचूक भाकीत करून आपत्ती व्यवस्थापन आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत गती आणून प्रभावी उपाययोजना राबविणे हा आहे.

ही प्रणाली भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन (NSM) अंतर्गत विकसित करण्यात आली आहे. या योजनेचा भाग म्हणून, C-DAC पुणे येथील उच्च कार्यक्षमता संगणन (HPC) गटाने भारतीय शहरांसाठी शहरांमध्ये निर्माण होणाऱ्या विविध पर्यावरणीय समस्यांचा ( पावसाचे प्रमाण, पूर, वायू प्रदूषण, उष्णतेच्या लाटा) अभ्यास करून त्यांचे संगणकीय मॉडेल तयार केले आहे. या संदर्भात, मल्टि-सेक्टोरियल सिम्युलेशन लॅबची उभारणी केली गेली असून हवामान, जलव्यवस्थापन, आरोग्य, वाहतूक इत्यादी विविध क्षेत्रांमधील घटक एकत्रितपणे समाविष्ट केले गेले आहेत आणि आभासी प्रयोगांद्वारे त्यांच्या परिणामांवर अभ्यास केला जात आहे.

हेही वाचा    :    HSC Result | बारावीच्या रिझल्टची तारीख बदलली, कधी लागणार रिजल्ट? 

त्याचबरोबर, प्रयोगशाळेच्या मदतीने एक विज्ञानाधिष्ठित निर्णय सहाय्यक आराखडा विकसित केला जात असून यामुळे शहर प्रशासनाला धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मदत होणार आहे. या पद्धतीच्या माध्यमातून पाऊस, पूर, वायू प्रदूषण यांसारख्या शहरी पर्यावरणीय समस्या ओळखता येतात आणि त्यावर वेळेवर उपाययोजना आखता येतात, ज्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे हाताळता येते.

प्रणालीची ठळक वैशिष्ट्ये –

  • प्रणालीच्या माध्यमातून ७२ तासांपूर्वीच भाकीत
  • हवामान, जलविज्ञान, वायू गुणवत्ता समावेश
  • स्वयंचलित पडताळणी व मूल्यांकन प्रणाली
  • धोरणकर्ते आणि नागरिकांना सुलभ माहिती
  • स्थानिक पातळीवर त्वरित निर्णयासाठी मदत
  • आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम व परिणामकारक

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

आपत्तीपूर्व तयारी ही सुरक्षित शहराच्या बांधणीसाठी अत्यावश्यक आहे. C-DAC च्या सहकार्याने विकसित केलेली प्रगत हवामान व पूर पूर्वसूचना प्रणाली पिंपरी चिंचवड शहराला अधिक सक्षम, जागरूक आणि आपत्ती निवारणास सज्ज बनवेल. या प्रणालीच्या मदतीने धोरणनिर्मितीपासून नागरिकांच्या सुरक्षेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर परिणामकारक निर्णय घेता येणार आहेत.

– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button