भिवंडीत केमिकल साठा असलेल्या इमारतीला अचानक लागली आग
![A fire broke out in a building with chemical reserves in Bhiwandi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/A-fire-broke-out-in-a-building-with-chemical-reserves-in-Bhiwandi.jpg)
ठाणे | भिवंडीतील मानकोली नाक्याजवळील इंडियन कार्पोरेशन कॉम्प्लेक्समधील इमारतीला सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या तळमजल्यावरील गाळा क्रमांक-७ इथे लाकडी वस्तूंना शायनिंग करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकलचा साठा असलेल्या गाळ्यामध्ये आग लागली. याबाबत स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाचे जवान दोन वाहनांसह पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.दरम्यान, इमारतीला आग लागल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. अचानक लागलेल्या आगीमुळे काही काळासाठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
दापोली पोलीस स्टेशनला आग, कागदपत्र जळाल्याची शक्यता