पार्कस्ट्रीट ‘सब-वे’चे काम लवकर पुर्ण करा – नगरसेवक संदीप कस्पटे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/IMG-20190125-WA0035.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपळे निलख येथील पार्कस्ट्रीट लगत सब’वे’चे काम सुरू आहे. या कामाची नगरसेवक संदीप कस्पटे यांनी आज (सोमवारी) पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना हे काम तात्काळ पूर्ण करून रस्ता नागरिकांसाठी तातडीने खुला करण्यासंदर्भात सूचना केल्या. यावेळी बीआरटीचे कार्यकारी अधिकारी ज्ञानदेव जुंधारेे तसेच विद्युत व स्थापत्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नगरसेवक संदीप कस्पटे यांनी सोमवारी (दि.28) पार्कस्ट्रीट लगतच्या सब वेच्या कामाची पाहणी केली. यावेळी सदरील काम तात्काळ पूर्ण करून जनसामान्यांना सुविधांचा लाभ त्वरित होईल, या दृष्टीने कामाचा वेग वाढविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. या कामासंदर्भात येणाऱ्या विजेच्या खांबाच्या अडचणीबाबत महापालिकेच्या विद्युत विभागाशी समन्वय साधून हे काम येत्या एक महिन्यात पूर्ण करून तेथील मार्ग जनसामान्यांना खुला करण्याच्या सूचना संदीप कस्पटे यांनी दिल्या.